PAKKRUTI-भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय पाक कृती स्पर्धा संपन्न





  • आज दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुक्यातील निवड झालेल्या 17 केंद्रातील स्पर्धकांची पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  • यामध्ये स्पर्धक हे शाळा स्तरावर तसेच केंद्रस्तरावर भाग घेऊन निवडून आलेले होते.
  • निवडून आलेल्या केंद्रातील एका स्पर्धकाला पाककृती स्पर्धेसाठी तालुकास्तरावर बोलवण्यात आले होते.
  • या स्पर्धेसाठी श्रीमती के एस वळवी मॅडम प्राध्यापिका मोरेश्वर कॉलेज भोकरदन, श्रीमती अंजली भरणे मॅडम सहशिक्षिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भोकरदन आणि योगिता वाडेकर मॅडम गट साधन केंद्र भोकरदन यांना सदरील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. 

PAKKRUTI-भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय पाक कृती स्पर्धा संपन्न


  • या स्पर्धेचे अध्यक्षस्थानी श्री डी एस शहागडकर गटशिक्षणाधिकारी तथा अधीक्षक पीएम पोषण पंचायत समिती भोकरदन हे होते.
  • यामध्ये स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आणले होते.
  • यामध्ये विशेषता तृणधान्य चे पदार्थ तयार करून आणणे गरजेचे होते.
  • सर्व स्पर्धाकांनी तृणधान्यावर आधारितच पदार्थ तयार करून आणले होते.
  • या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक काढण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले होते.





  • त्यां निकषच्या आधारावरच  परीक्षकांनी तालुकास्तरावर तीन स्पर्धकांची निवड केली.
  • यामध्ये प्रथम क्रमांक - श्रीमती मीना सहाने जि.प.प्रा.शा.सोयगाव देवी केंद्र बरंजळा साबळे,द्वितीय क्रमांक - श्रीमती कविता भारती जि.प.प्रा.शा.जानेफळ दाभाडी केंद्र केदारखेडा व तृतीय क्रमांक - श्रीमती अंजली मोहिते जि.प.प्रा.शा.गोषेगाव केंद्र सिरसगाव मंडप यांचा घोषित करण्यात आला.
  • निवड झालेल्या स्पर्धकांना अनुक्रमे रु.5000, रु.3500 व रु.2500 इतके बक्षीस ठेवण्यात आले आहे.
  • सदरील रक्कम जिल्हा स्तरावरून स्पर्धाच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.
  • या स्पर्धेसाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील श्री एस बी नेवार सर गट समन्वयक आणि श्रीमती भिंगोले मॅडम शिक्षण विस्तार अधिकारीपंचायत समिती भोकरदन हे उपस्थित होते 
  • तसेच या स्पर्धेसाठी  श्री.नंदकिशोर शेटे, श्री.चंद्रशेखर देशमुख,श्री.शेख शब्बीर,श्री.संतोष काकडे,श्री.उमेश गोराडे श्री.संदीप दळवी, श्री.संदीप देशमुख,श्री.संदीप कळम व श्री हनुमान तळेकर यांनी या स्पर्धा साठी विशेष अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post