वनरक्षक हा महाराष्ट्र वन विभागातील एक कर्मचारी आहे. वनरक्षक पदाच्या भरपूर जागा असल्यमुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
- वनरक्षक वेतन श्रेणी - S-8 : 21700-69100 + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
- वनरक्षक पदासाठी फॉर्म हा ऑनलाईन पध्दतीनेच भरायचा असतो.
- वनरक्षक पदासाठी परिक्षा ही ऑनलाईन स्वरुपाची असेल.तसेच या परीक्षेसाठी शारीरिक चाचणी सुद्धा असते. शारीरिक चाचणी ची माहिती प्रत्यक्ष जाहिरात मध्ये असते.
- वनरक्षक पदासाठी अर्ज हा फक्त एकाच विभागासाठी ग्राह्य धरण्यात येईल.अनेक विभागासाठी अर्ज केल्यास तो अर्ज बाद करण्यात येतो.हे या ठिकाणी लक्षात ठेवावे.
वनरक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता-
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 12 वी ही विज्ञान Science किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या पैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केली असावी.
- अनुसुचित जमाती ST प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षाइयत्ता 10 वी उत्तीर्ण केली असल्यास तो पात्र अर्ज करण्यास पात्र राहील.
- माजी सैनिक उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षाइयत्ता 10 वी उत्तीर्ण केली असल्यास तो पात्र अर्ज करण्यास पात्र राहील.
- नक्षलवादयाच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे किंवा वन कर्मचारी यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षाइयत्ता 10 वी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेद्वार अर्ज करण्यास पात्र राहील.परंतु यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक असेल याची नोंद घ्यावी.
- संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. नसल्यास
- नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ते प्राप्त करणे आवश्यक आहे.
- मराठी विषयाचे ज्ञानलिहीणे,वाचणे,बोलणे असणे आवश्यक .
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक शैक्षणीक पात्रता-
- खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे.
- खेळाडूने सदर पदासाठी सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व इतर अर्हता प्राप्त केलेली असावी.
- खेळाडूंसाठी आरक्षणाबाबत क्रीडाविषयक अर्हता अर्जासोबत क्रीडा विषयक प्रमाणपत्राची संबंधित विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण यांचेकडील पडताळणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
माजी सैनिकांच्या अर्हतेबाबत-
पदवी परीक्षा ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एजुकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात.वनरक्षक पदासाठी कमाल व किमान वयोमर्यादा खालील प्रमाणे –
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत असतो
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 18 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 18 पेक्षा कमी व 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.यामध्ये EWS चा देखील समावेश आहे.
- पदवीधारक/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी: कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील.
- खेळाडू उमेदवारांसाठी: विहित वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि, उच्चतम वयोमर्यादा 32 इतकी राहील.
- प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी: सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी: माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील. तसेच, अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45वर्षापर्यंत राहील.
- स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी : सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील.
- अनाथ : कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील
- रोजंदारी कर्मचारी : 18 वर्षापेक्षा कमी व 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- होमगार्ड करिता 3 वर्ष सेवा झालेली असणे आवश्यक आहे.
तथापि महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव 2023/प्र.क्र./14/कार्या12दि.3मार्च 2023 अन्वये दि31डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.
शारीरिक पात्रता – पुरुषासाठी
उमेदवाराने खालील प्रमाणे उंची,छाती व वजन निकष पुर्ण केलेले असावे.किमान उंची – 163 cm
छातीचा घेर – न फुगवता – 79 cm
छातीचा घेर – फुगवून – 84 cm
वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असावे.
शारीरिक पात्रता – स्त्रीसाठी
किमान उंची - 150 cmछातीचा घेर न फुगवता – सुट
छातीचा घेर फुगवून – सूट
वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असावे.
अनुसुचित जमाती ST मधील उमेदवारासाठी खालीलप्रमाणे सुट असते.
शारीरिक पात्रता – पुरुषासाठी
उमेदवाराने खालील प्रमाणे उंची,छाती व वजन निकष पुर्ण केलेले असावे.किमान उंची – 152.5 cm
छातीचा घेर न फुगवता -79 cm
छातीचा घेर फुगवून - 84 cm
वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असावे.
शारीरिक पात्रता – स्त्रीसाठी
किमान उंची - 145 cmछातीचा घेर न फुगवता – सुट
छातीचा घेर फुगवून – सुट
वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असावे.
उमेदवाराची दृष्टि चांगले असणे आवश्यक आहे.
परीक्षेचे स्वरूप-
- वनरक्षक भरती परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण 60 प्रश्न विचारले जातात.प्रत्येक प्रश्नाला 02 गुण असतात. वनरक्षक भरती परीक्षा 120 गुणांची असते.या मध्ये मराठी विषयाचे (15प्रश्न)30गुण, इंग्रजी विषयाचे (15प्रश्न)30गुण, सामान्य ज्ञान विषयाचे (15प्रश्न)30गुण, बुद्धीमत्ता विषयाचे (15प्रश्न)30गुण,विचारले जातात.
- या परीक्षेसाठी एकूण दोन तासांचा वेळ असतो.
Post a Comment