उच्च शिक्षणासाठी मिळेल आता २० लाखापर्यंत बिनव्याजी Education Loan

  • महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थिनी यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी,त्यांना शैक्षणिक व आर्थिक सक्षम करण्यासाठी या विद्यार्थ्यांना बिनव्याजी Education Loan देण्याचे काम करते.
  • आता विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी घेतलेले Education Loan वरचे व्याज स्वत राज्य शासन भरणार आहे.हि योजना फक्त इतर मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थिनी यांच्यासाठी आहे.
  • महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ परदेशात,देशांतर्गत तसेच राज्यातील उच्च प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी / विद्यार्थिनी २० लाखापर्यंत बिनव्याजी Education Loan देते.

उच्च शिक्षणासाठी मिळेल आता २० लाखापर्यंत बिनव्याजी Education Loan


योजनेचे स्वरूप-

1.राज्यातील शिक्षणासाठी -१० लाख

2. देशांतर्गत शिक्षणासाठी – १० लाख

३.परदेशी शिक्षणासाठी – २० लाख


बिनव्याजी Education Loan साठी अटी खालीलप्रमाणे -

  • अर्जदाराचे वय 17 ते 30 असावे.
  • अर्जदार हा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराला इयत्ता 12 वी मध्ये 60 % च्या वर मार्क असावे.
  • अर्जदाराचा सिबिल स्कोर हा 500 च्या वर असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत आसवे.  


या मध्ये मेडिकल,इंजिनीरिंग ,व्यावसाईक अभ्यासक्रम व Agriculture या उच्च शिक्षणाचा समावेश होतो







Post a Comment

Previous Post Next Post