भोकरदन तालुक्यात कोतवाल पदाची भरती

  • नवीन नियमावलीनुसार कोतवाल हे पद वर्ग चार संवर्गात  मोडत नाही, हे अवर्गिकृत पद आहे.
  • कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे.
  • कोतवाल हे पद ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत असणारे पद आहे.
  • ग्राम स्तरावरील दस्ताऐवज सुस्थितीमध्ये ठेवणे तसेच ग्रामसेवक , तलाठी व पोलिस पाटील यांनी वेळोवेळी सांगितलेले काम करणे , गावांमध्ये शांतता राखण्यासाठी पोलिस पाटील यांना मदत करणे , शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे , इत्यादी कामे कोतवाल यांना करावे लागते .
  • कोतवालांची संख्या गावाच्या लोकसंख्यवर अवलंबून असते.
  • मात्र एखादया गावी एकाहून अधिक कोतवाल नेमण्याचा अधिकार शासनाच्या परवानगीने जिल्हाधिकार्यास आहे.
  • भोकरदन तालुक्पयातील 17 रिक्त पदासाठी पात्र आणि शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून Offline अर्ज मागविण्यात येत आहे.



पदाचे नाव व रिक्त जागा - कोतवाल - 17 जागा


वेतनश्रेणी – रु.15000/- दरमहा मानधन


परीक्षा तारीख – दि.10.09.2023

परीक्षा फीस -

  • GEN प्रवर्गातील उमेदवार – 500 /-रु.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार - 400 /-रु.
  • परीक्षा फीस ही डी.डी.च्या स्वरुपात भरावी .


भोकरदन कोतवाल भरती जाहिरात 2023 येथे Download करा


जालना जिल्हातील कोतवाल भरती जाहिरात 2023 येथे Download करा




वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


परीक्षा स्थळ –

  • जालना जिल्‍हयातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.
  • या बाबत प्रवेशपत्र द्दवारे उमेदवाराना कळविण्यात येईल.

वय –

  • दि.22.08.2023 रोजी 18 ते 40 वर्षे  (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

शैक्षणिक पात्रता –

  • उमेदवार किमान ४ थी पास असावा.
  • मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप –

  • परीक्षा मराठी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची Offline पेपर वर असेल.
  • कोतवाल पदासाठी 50 प्रश्नांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.या परीक्षेसाठी 60 मिनिट कालावधी असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज तहसील कार्यालय भोकरदन येथे रु.50 भरून घ्यावा लागेल.
  • अर्ज हा सुस्पष्ट अक्षरात भरून आवश्यक असलेले कागदपत्रे  जोडून तहसिल कार्यालय भोकरदन येथे विहित कालावधीत द्यावा लागेल.
  • उमेदवार हा भोकरदन तालुक्यातील रहिवाशी असला पाहिजे.
  • उमेदवार हा शारिरीक दृष्ट्या सक्षम असावा ,
  • तसेच उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा असू नये .
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 08.08.2023 ते 22.08.2023 आहे.




Post a Comment

Previous Post Next Post