एकलव्य मॉडेल निवासी (EMRS) शाळेत 4062 जागासाठी मेगा भरती

ST प्रवर्गातील 6 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी National Education Society for Tribal Students (NESTS), च्या अंतर्गत Eklavya Model Residential Schools (EMRS) ची स्थापना करण्यात आली आहे.

या शाळेमध्ये मुला मुली साठी वेगवेगळे वसतिगृहे असावेत या उद्देशाने तालुका स्तरावर निवासी शाळा स्थापना करण्यात आल्या आहे.

नवोदय विद्यालय च्या धर्तीवर या शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.

या शाळेत शिक्षकासाठी मेस,मैदान ई.सोयी सुविधा आहेत.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही पूर्णपणे निवासी शाळा आहे.

त्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोफत निवास मध्ये राहतात.

आता एकलव्य मॉडेल निवासी शाळा ने वेगवेगळ्या पदासाठी 4062 जागांची भरती काढली आहे .

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.




पदाचे नाव आणि पदांची संख्या – 4062

  • प्राचार्य (Principal) - 303
  • पदव्युत्तर शिक्षक ( PGT) - 2266
  • लेखापाल (Accountant )- 361
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(Jr. Secretariat Assistant) (JSA) - 759
  • Lab Attendant- 373

परीक्षा तारीख – नंतर कळविण्यात येईल

परीक्षा फीस –

  • प्राचार्य - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 2000 /-रु.
  • पदव्युत्तर शिक्षक ( PGT) - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 1500 /-रु.
  • लेखापाल (Accountant ) - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(Jr. Secretariat Assistant) (JSA) - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
  • Lab Attendant - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु
SC/ST/अपंग– फीस नाही

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील मुंबई या केंद्रावर घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

  • प्राचार्य - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार 50 वर्षाच्या वर नको.( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • पदव्युत्तर शिक्षक ( PGT) - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार 40 वर्षाच्या वर नको.( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • लेखापाल (Accountant ) - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार 30 वर्षाच्या वर नको.( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(Jr. Secretariat Assistant) (JSA) - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार 30 वर्षाच्या वर नको.( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • Lab Attendant - GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार 30 वर्षाच्या आत.( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

शैक्षणिक पात्रता –

प्राचार्य (Principal) –

  • अ) मान्यताप्राप्त विद्यापीठातील विशेष प्राविण्य मिळवलेली पदव्युत्तर पदवी
  • आ)B.ED. पदवी
  • इ) उप प्राचार्य पदाचा 12 वर्षाचा अनुभव आणि इतर शैक्षणिक अनुभव

पदव्युत्तर शिक्षक ( PGT) –

  • अ) मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी
  • आ)B.ED. पदवी

लेखापाल (Accountant )-

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील commerce ची पदवी

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(Jr. Secretariat Assistant) (JSA) –

  • 12 वी पास
  • टायपिंग इंग्रजी 30 किंवा हिंदी 35

Lab Attendant- 373

  • 10 वी पास
  • lab technology चा डिप्लोमा
किंवा
  • 12 science पास

परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी माध्यमात असेल.
  • ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची OMR बेस असेल.(पेन-पेपर)
  • सदरील परीक्षा करिता negative मार्किंग आहे .

प्राचार्य (Principal) –

  • OBJECTIVE प्रश्न -130 मार्क
  • भाषा क्षमता चाचणी (LCT) -20 मार्क
  • मुलाखत – 40
  • परीक्षा कालावधी – 3 तास

पदव्युत्तर शिक्षक ( PGT) –

  • OBJECTIVE प्रश्न -130 मार्क
  • भाषा क्षमता चाचणी (LCT) -20 मार्क
  • परीक्षा कालावधी – 3 तास

लेखापाल (Accountant )-

  • OBJECTIVE प्रश्न -130 मार्क
  • परीक्षा कालावधी – 2.5 तास

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(Jr. Secretariat Assistant) (JSA) –

  • OBJECTIVE प्रश्न -130 मार्क
  • टायपिंग परीक्षा – 50 मार्क
  • परीक्षा कालावधी – 2.5 तास

Lab Attendant-

  • OBJECTIVE प्रश्न -120 मार्क
  • परीक्षा कालावधी – 2.5 तास

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे.



एकलव्य मॉडेल निवासी शाळाची जाहिरात २०२३ येथे Download करा









वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा



2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post