SBI SO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे पात्र उमेदवारांकडून विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. SBI ने या विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी जाहिरातीमधे नमूद करण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 1040 पदांसाठी (SBI SO Bharti 2024) भरती जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना देखील जारी केली गेली असून त्याबाबतची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव : प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), कोअर रिसर्च टीम्स (उत्पादन लीड) भर्ती, कोअर रिसर्च टीम्स (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (व्यवसाय), व्हीपी वेल्थ+, रिलेशनशिप मॅनेजर, प्रादेशिक पदे व्यवस्थापक, बिझनेस रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), गुंतवणूक विशेषज्ञ, गुंतवणूक अधिकारी.
पदांची संख्या: वर नमूद केलेल्या पदासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया भर्ती राबवत आहे. 1040 रिक्त जागा या भरती अंतर्गत या पदावर भरल्या जातील.
शैक्षणिक पात्रता | Eligibility criteria for SBI SO Bharti 2024
शैक्षणिक पात्रता प्रकाशनानुसार बदलते; अधिक तपशिलांसाठी मूळ अधिसूचनेची PDF पहा.
वयोमर्यादा
1 एप्रिल 2024 पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि उमेदवारांचे वय हे 23 ते 42 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. येथे वयोमर्यादेत श्रेणीनुसार सूट सुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे SC, ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट उपलब्ध आहे.
महावितरणमधे 6222 पदांसाठी मेगा भरती, सविस्तर तपशील पाहा
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज | SBI SO Bharti 2024
वरील पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे; हा अर्ज कसा करावा आणि यासाठीची ऑनलाइन लिंक, याबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
अर्ज फी: सामान्य आणि EWS साठी फी रु 750 आहे, तर SC, ST, PWD साठी कोणतीही फी नाही.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: जर तुम्ही वरील भरती अंतर्गत अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला तुमचा अर्ज लवकरात लवकर सबमिट करावा लागेल. 8 ऑगस्ट 2024 ही या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
नोकरीचे ठिकाण कोणते: भारतात कुठेही
स्टेट बँक ऑफ इंडिया मधील भरती साठी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा? | Application Process of SBI SO Bharti 2024
- तुम्ही वर नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणार असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि लगेच अर्ज भार.
- वाचकांनी खाली दिलेली संपूर्ण मूळ PDF जाहिरात, अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचावी.
- त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन अर्ज सबमिट करायचा आहे.
- सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. तिथे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिसेल.
- हा अर्ज करत असताना तुम्हाला तुमची सर्व माहिती अचूक भरणे गरजेचे आहे.
- त्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
- अर्ज शुल्क भरावा लागणार असल्यास, कृपया अर्ज फी भरा आणि तुमचा अर्ज सबमिट करावा.
महत्वाच्या लिंक
- मूळ जाहिरातिची PDF : (https://drive.google.com/file/d/11fMUX6uTP6BVe1HZ7Sw8hTwqi3jFD-0N/view?usp=sharing)
- ऑनलाइन अर्जाची वेबसाइट : (https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply)
- भरतीची अधिकृत वेबसाइट : (https://sbi.co.in/)
Post a Comment