AURANGABAD - राजपत्रात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली

महाराष्ट्र सरकारने 15 सप्टेंबर रोजी 2023 राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलली आहे. त्यामुळे इथून पुढे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव *छत्रपती संभाजीनगर* आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव *धाराशिव* असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आला आहे.

AURANGABAD - राजपत्रात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली


मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही असं सांगितलं होतं. पडताळणी झाली नसताना तुम्ही नावं कशी बदलली अशी विचारणा हायकोर्टाने केली. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं. ही प्रक्रिया पूर्ण करुन आम्ही विचार करु असं सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर सरकारकडून राजपत्र जारी करण्यात आलं. त्यानुसार आता उस्मानाबाद आणि औरंगाबाद या संपूर्ण जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली.  


या अगोदर औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात आलं होतं. पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचं नाव बदललेलं नव्हतं. ते आता  राजपत्र जारी करुन बदलण्यात आलं आहे.


 *नावात खालीलप्रमाणे बदल..* 

▪️औरंगाबाद विभाग ➡️ छत्रपती संभाजीनगर विभाग

▪️औरंगाबाद जिल्हा➡️छत्रपती संभाजीनगर जिल्हा

▪️औरंगाबाद उप-विभाग➡️छत्रपती संभाजीनगर उप-विभाग

▪️औरंगाबाद तालुका➡️छत्रपती संभाजीनगर तालुका

▪️औरंगाबाद गाव➡️छत्रपती संभाजीनगर गाव

▪️उस्मानाबाद जिल्हा ➡️धाराशिव जिल्हा

▪️उस्मानाबाद उप-विभाग ➡️धाराशिव उप-विभाग

▪️उस्मानाबाद तालुका ➡️धाराशिव तालुका

▪️उस्मानाबाद गाव ➡️धाराशिव गाव


वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post