- रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी रतन टाटांना महाराष्ट्र शासनाचा 'उद्योगरत्न' पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव केला.
- महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे.
- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात आला आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुरस्काराचे स्वरुप -
- 'उद्योगरत्न' पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
- 'उद्योगमित्र' पुरस्काराचे स्वरुप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र,असे आहे.
- 'उद्योगिनी' पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्रअसे आहे.
- 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.
रतन टाटा यांच्या विषयी इतर माहिती -
- रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
- उद्योग आणि व्यापार या क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी सन 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
- त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे.
- नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील 25 प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचे जाहीर केले होते.
- मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.
- रतन टाटा यांना यावर्षीच ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले होते.
- या व्यतिरिक्त टाटा यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Post a Comment