बुडापेस्ट येथे झालेल्या World Athletics Championships (WAC) मध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय बनला आहे.
त्याचे हे यश देशातील तरुणांना प्रेरणा देणारे आहे.
खुप खूप अभिनंदन नीरज चोप्रा!
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रविवारी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्याने पुरुष भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्यासोबतच त्याचा मित्र व पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने रौप्य पदक आपल्या नावे केले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांना बक्षीस म्हणूनही तगडी रक्कम मिळाली. भारत आणि पाकिस्तानच्या या दोन्ही खेळाडूंना विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. त्यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. नीरजने 88.17 मीटर व अर्शदने 87.82 मीटर इतकी फेक केली. अर्शद याचीही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. या स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देखील मोठी दिली जाते. सुवर्णपदक जिंकलेल्या नीरजला 70,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 58 लाख रुपये मिळाले. तर,अर्शदला दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने 35,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 28 लाख रुपये देण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम देण्यात येत आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
नीरज हा भारताचा वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला ऍथलिट आहे. मागील वेळी त्याने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले. मात्र, आता ऑलिंपिक सुवर्ण व जागतिक विजेता अशी दोन्ही पदके त्याच्याकडे आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केलेले. ऍथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक होते.
IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा
IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Post a Comment