MHADA म्हणजेच म्हाडा – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण होय.
महाराष्ट्र शासनाची ही योजना महाराष्ट्र राज्यात रहिवासी असलेल्या सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देते.
म्हाडा ची ही घर देण्याची प्रक्रिया लॉटरी पद्धतीने सुरू असते.
म्हाडा कडून योजनेतील घरांसाठी अर्ज मागविले.
या अर्जामध्ये त्या अर्जदाराचे उत्पन्न दाखविलेले असते. त्यानुसार त्याला काढलेल्या योजनेत एकूण किती घरे आहेत आणि त्याला दिलेल्या घराची किती किंमत लावायची हे ठरत असते.
म्हाडाच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत स्पष्ट केले होते.
त्यानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून येत्या आठवड्याभरात पुणे मंडळाच्या ५ हजारांहून अधिक घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तर कोकण मंडळाच्या माध्यमातून ४ हजार ५०० व औरंगाबाद मंडळाच्या माध्यमातून ४०० घरांच्या लॉटरीची लगबग सुरू करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा.
दसरा – दिवाळीच्या मुहूर्तावर १० हजार घरांची लॉटरी म्हाडाच्या माध्यमातून पार पडणार आहे.म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी म्हाडाच्या पुणे, कोकण व औरंगाबाद मंडळाने लॉटरीची तयारी सुरू केली आहे.
यामध्ये पुणे मंडळाची ५ हजार, कोकण मंडळाची ४ हजार ५००, तर औरंगाबाद मंडळाची ५०० हून अधिक घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
लॉटरीची जाहिरात २५ ऑगस्टदरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार असून तेव्हापासून अर्ज विक्री व स्वीकृतीला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळांतर्गत विरार बोळिंज, ठाणे, डोंबिवली येथील घरांचा, तर पुणे मंडळांतर्गत सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांचा व औरंगाबाद मंडळांतर्गत औरंगाबाद, आंबेजोगाई आणि लातूरमधील घरांचा समावेश असणार आहे.
अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश लॉटरी मधे असणार आहे.
Post a Comment