chandrayaan 3 - भारताची चंद्राला गवसणी - कोणत्याही देशाला जे जमल नाही ते आपल्या देशाने करून दाखवल !


जगातल्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी...


संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
मुख्य कंत्राटदारभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
सोडण्याची तारीख२३ ऑगस्ट २०२३
कुठुन सोडलीसतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
सोडण्याचे वाहनLVM3 M4
प्रकल्प कालावधीविक्रम लँडर : ≤ १४ दिवस (नियोजित)
प्रज्ञान लँडर: ≤ १४ दिवस (नियोजित)
वस्तुमान३९०० किलो
ठिकाणसतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा

  • इस्रोच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. 
  • इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. 

ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय...

            गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा... कारण, भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत शिरलं आहे....



इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
  • चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.
  • चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. 
  • इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.

चंद्रयान-३ चे ॲनिमेशन
पृथ्वीभोवती
चंद्राभोवती
       चंद्रयान-३ ·        पृथ्वी ·        चंद्र


  • भारताच्या चांद्रयान-3 नं यशस्वी लँडिंग केलं आहे. 
  • भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. 
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. 
  • यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 
  • भारताची शान चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरलं आहे. 
  • 14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे.
  •  प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.

chandrayaan 3 - भारताची चंद्राला गवसणी - कोणत्याही देशाला जे जमल नाही ते आपल्या देशाने करून दाखवल !


वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


  • संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली भारताची चंद्रमोहिम यशस्वी ठरली आहे.
  •  प्रत्येक भारतीयाची छाती गर्व आणि अभिमानाने फुलून गेली आहे. 
  • चांद्रयान-2 मोहिमेत अपशय आल्यानंतरही भारतानं हार मानली नाही. 
  • जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2020 मध्ये चांद्रयान-3 मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचं फळ आज मिळालं आहे. 
  • आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता यशस्वी उड्डाण केलं आणि आज या चांद्रयान-3 नं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आहे.




Post a Comment

Previous Post Next Post