- विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्यासाठी व योग्य दिशा देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असते.
- त्याकरिता राज्य सरकार व केंद्र सरकार विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते.
- अश्यातच आता राज्य सरकारच्या जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप खरेदीसाठी 30000/- रु अनुदान दिले जाणार आहे.
- सध्याच्या युगात दुनिया डिजिटल होत चालली आहे.
- आता सर्व प्रकारचे शिक्षण 90% डिजिटल शिक्षण झाले आहे.
- विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी कॉम्पुटर, लॅपटॉप tab ई या साधनाची आवश्यकता असते.
- कॉम्पुटर, लॅपटॉप tab या मध्ये सध्या डिजिटल कामे करण्यासाठी लॅपटॉप हे साधन सर्वात सोपे आणि कुठे नेण्यास चालते.
- विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर अनेक शैक्षणिक व त्या संबंधी इतर प्रकारची कामे करावी लागतात.
- जसे प्रोजेक्ट बनवणे,Online लेक्चर पाहणे,Online टेस्ट देणे, Online संशोधन करणे ई.
- महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने एक ‘मोफत लॅपटॉप योजना ‘(Free Laptop Scheme) या नावाने खास योजना सुरु केली आहे.
- या योजनेच्या नावावरून कळते की विद्यार्थ्य्ना कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च न करता लॅपटॉप घेता येणार आहे.
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप फायदा होणार आहे.
- अनेक विद्यार्थ्यांची कुटूंबाची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाखीची आणि बेताची असते.
- अश्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी त्यांचे कडे तेवढे पैसे नसतात.
- कुठलाही आणि कोणत्याही कंपनी चा लॅपटॉप घेण्यासाठी आज जवळपास 25000 ते 30000 रुपये लागतात.
- यामुळे हे सामान्य तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप घ्यायला परवडत नाही. हे कारण लक्षात घेऊन ‘मोफत लॅपटॉप योजना ‘(Free Laptop Scheme) सुरू केली आहे.
- या योजनेमार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी प्रती विध्यार्थी 30000 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
- फक्त मेडिकल आणि इंजिनियरिंग शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही योजना आहे .
- इतर शाखेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेस पात्र नाहीत.
- ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागाकडून राबवली जाते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मेडिकल आणि इंजिनियरिंग शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना Offline प्रकारे अर्ज करावा लागणार आहे.
- ही योजना राज्यातील काही निवडक जिल्ह्यात सुरू आहे.
- ही योजना आपल्या जिल्ह्यासाठी आहे कि नाही हे माहित करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभगात जाऊन चौकशी करावी लागेल.
- या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.
- अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे याबाबत माहिती मिळालेली नाही.
- आज रोजी ही योजना सध्या हिंगोली जिल्ह्यात चालू येत आहे.लवकरच इतर जिल्ह्यात सुरु होईल.
योजनेसाठी पात्रता
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ SC,ST,OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच घेता येईल.
- योजनेचा लाभ मेडिकल आणि इंजिनियरिंग शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment