आपण या लेखात BARTI या संस्थेच्या योजनेची सविस्तर माहिती बघणार आहोत.
- बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था.
- बार्टी ची स्थापना 1978 साली मुंबई येथे झाली.
- 1987 साली ही संस्था पुणे येथे स्थलांतरित झाली.
- आज रोजी या संस्थचे मुख्यालय पुणे येथे आहे.
- सामाजिक समता हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार सामान्य लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या दृष्टीने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
- या विषयाशी निगडीत असे व्यावसायिक ज्ञान आणि तसेच अशा विचारांची देवाण – घेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानमध्ये समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण ही संस्था देते.
- त्यासाठी या संस्थेने पूर्ण महाराष्ट्रात समतादूत नियुक्त केलेले आहेत.
- पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी या संस्थे ने दिल्लीत राहून UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
- त्यासाठी ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, अशा अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांसाठीच ही योजना आहे.
- म्हणून 14 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पात्र व इच्छुक उमेदवारा कडून ऑनलाईन अर्ज मागवले आहे .
- 27 ऑगस्ट 2023 ला सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET घेऊन 300 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
- महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थी दिल्लीत स्वताच्या पैशाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात.
- तेथील प्रसिद्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कोचिंग सुद्धा घेतात.
- आता आपल्या राज्यातील अनुसूचित जाती चे (SC) विद्यार्थी UPSC ची तयारी राज्य शासनाच्या खर्चाने करू शकतात.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फ्री मध्ये निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
- त्यासाठी इच्छुक उमेदवार यांनी www.siac.org.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचे आहे.
- राज्य सरकार राज्यातील अनुसूचित जाती(SC) आणि नवबौद्ध समाजातील 300 उमेदवारां करिता निवास, कोचिंग, जेवण आणि पाठ्यपुस्तकाचा खर्च स्वत करणार आहे .
- नागरी सेवा (UPSC) पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी हे प्रशिक्षण फ्री मध्ये दिले जाईल.
- 30 % जागा मुलीसाठी राखीव असतील.
- 4 % अपंगासाठी राखीव असेल.
- 5 % जागा अनुसूचित जातीतील बेरड, मातंग, वाल्मिकी, होलार आणि मादगीसाठी राखीव असणार आहे.
- या सर्व वंचित, उपेक्षित समूहातील जाती असल्याने त्यांना एकूण जागांच्या तुलनेत 5 % जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे.
- कुटुंबियांचे उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराकडे राज्याने दिलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- उमेदवार हा UPSC च्या वयोमर्यादेत बसणारा असावा.
- उमेदवाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची मर्यादा वार्षिक 8 लाख असावी.
- उमेदवारांना दिल्लीतील निवास, भोजनासाठी प्रत्येक महिन्याला 13 हजार रूपयांचे विद्यावेतन मिळेल
- विद्यार्थी ज्या ‘कोचिंग’मध्ये प्रवेश घेईल, त्याचे शुल्क बार्टी भरेल.
- उमेदवाराची ‘कोचिंग’मध्ये उपस्थिती मात्र अनिवार्य असेल.
- उमेदवारांना पहिल्यांदा दिल्लीला जाण्याकरिता 5 हजार रूपये दिले जातील.
- उमेदवारांना पहिल्या महिन्यात 3 हजार रूपये दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत येण्याकरिता पुन्हा 5 हजार रूपये दिले जातील.
- CET मध्ये मेरीट मध्ये आलेल्याच उमेदवाराची निवड केली जाईल
सूचना -
- या योजनेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 आहे.
Post a Comment