भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदाच्या 342 जागांची भरती

  • भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI-Airports Authority Of India ) हा एक भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
  • भारत सरकारच्या संसद मध्ये पारित झालेल्या कायद्याने हा प्राधिकरण स्थापन करण्यात आला आहे.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI-Airports Authority Of India ) कडे भारत देशातील जमिनीवर आणि हवाई क्षेत्रात विमान वाहतुकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
  • तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या श्रेणी ची सुधारणा करणे ,देखभाल करणे,व्यवस्थापन करणे याची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI-Airports Authority Of India ) 137 विमानतळ चे व्यवस्थापन करते.
  • ज्या मध्ये 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ,10 सीमाशुल्क विमानतळ,80 देशांतर्गत विमानतळ आणि 23 देशांतर्गत परकीय मुलखाने वेढलेले विमानतळ यांचा समावेश होतो.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI-Airports Authority Of India )दर वर्षी रिक्त जागांची जाहिरात काढून तरुणांना नोकरी देण्याचे काम करते.
  • आता सुद्धा भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI-Airports Authority Of India ) मध्ये विविध पदासाठी 342 जागांची भारती काढण्यात आली आहे.
  • त्यासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.




पदाचे नाव आणि पदांची संख्या – 342

  • कनिष्ठ सहाय्यक (Jr.Asst.-Office)- 09
  • वरिष्ठ सहाय्यक (Sr.Asst.-Accounts)- 09
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Common Cadre)– 237
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Finance)– 66
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Fire Service)– 03
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Lae)– 18

वेतन श्रेणी –

  • कनिष्ठ सहाय्यक (Jr.Asst.-Office)- Rs.31000-3%-92000 + इतर भत्ते
  • वरिष्ठ सहाय्यक (Sr.Asst.-Accounts)- :- Rs.36000-3%-110000 + इतर भत्ते
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Common Cadre)– Rs.40000-3%-140000 + इतर भत्ते
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Finance)– Rs.40000-3%-140000 + इतर भत्ते
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Fire Service)– Rs.40000-3%-140000 + इतर भत्ते
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Lae)– Rs.40000-3%-140000 + इतर भत्ते

शैक्षणिक पात्रता –

  • कनिष्ठ सहाय्यक (Jr.Asst.-Office)- मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी
  • वरिष्ठ सहाय्यक (Sr.Asst.-Accounts)- 1) मान्यता प्राप्त विद्यापीठातील commerce या शाखेची पदवी                                                             2) 02 वर्षाचा अनुभव
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Common Cadre) - मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Finance) - 1) मान्यता प्राप्त विद्यापीठातील commerce या शाखेची                                                     पदवी                                                                                                                                         2) CWA/CA/MBA (Finance)
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Fire Service) - B.E./B.Tech (Fire/Mechanical/Automobile) शाखेतील पदवी
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Lae) - विधी शाखेतील पदवी (LLB)

परीक्षा तारीख – विभागाच्या वेबसाईट वर नंतर कळविण्यात येईल

परीक्षा फीस –

  • GEN/OBC/ प्रवर्गातील उमेदवार – रु.1000 /-
  • SC/ST/अपंग/महिला प्रवर्गातील उमेदवार – फीस नाही

परीक्षा स्थळ –

  • online फॉर्म भरताना परीक्षा साठी केंद्र निवडण्याची मुभा असते.
  • त्यानुसारच केंद्र निवडण्यात येते.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

04 सप्टेंबर 2023 रोजी 

  • कनिष्ठ सहाय्यक (Jr.Asst.-Office),- 30 वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • वरिष्ठ सहाय्यक (Sr.Asst.-Accounts),- 30 वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Common Cadre) - 27 वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Finance)– 27 वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Fire Service)– 27 वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • कनिष्ठ कार्यकारी (Jr.Executive-Lae)– 27 वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)


परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा इंग्रजी /हिंदी माध्यमात असेल.
  • ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची Computer based असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 05/08/2023 ते 04/09/2023 आहे.






वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा.






Post a Comment

Previous Post Next Post