Land Gift - जमीन बक्षीस पत्र व्यवहार म्हणजे काय ?

जमिनीच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज अर्थात कागदपत्रे असतात. यामध्ये आपण जर विचार केला तर हक्क सोडपत्र तसेच खरेदीखत, मृत्युपत्र इत्यादींचा उल्लेख करता येईल. यासोबतच बक्षीस पत्र हे देखील एक महत्त्वाचे दस्तऐवज असतो आणि त्याला आपण गिफ्ट डीड असे देखील म्हणतो.

बक्षीस पत्र हे एखाद्या जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून मृत्युपत्र हे कागदपत्र सोडल्यास बाकी कागदपत्रांची अंमलबजावणी ही व्यक्ती हयात असतानाच होत असते. जवळील नात्यांमध्ये तसेच प्रेमाखातीर किंवा आपुलकीमुळे केल्या जाणाऱ्या जे काही बक्षीस पत्र असतात याबद्दलच्या कायदेशीर तरतुदी या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या कलम 122 व 126 मध्ये नमूद केलेले आहेत. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये बक्षीस पत्राबद्दल काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

बक्षीसपत्र म्हणजे नेमके काय?

Land Gift - जमीन बक्षीस पत्र व्यवहार म्हणजे काय ?

बऱ्याचदा रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना संपत्ती बक्षिस रूपाने दिली जाते व यामध्ये भविष्यात  काही वाद विवाद होऊ नयेत याकरिता कायदेशीररित्या बक्षीस पत्र तयार करून घेणे कधीही फायद्याचे असते. साहजिकच आपण जेव्हा बक्षीस पत्र बनवतो त्याकरिता मुद्रांक अर्थात स्टॅम्प ड्युटी भरणे देखील गरजेचे असते. स्टॅम्प ड्युटीचा विचार केला तर संबंधित मालमत्तेची किंमत किती आहे व तिचे स्थान यानुसार या रकमेत बदल होतो.

मुद्रांक शुल्क भरल्यानंतर बक्षीस पत्राचे नोंदणी ही स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये करणे गरजेचे असते व ही नोंदणी केल्यानंतरच बक्षीस पत्राला कायदेशीर मान्यता अथवा वैधता मिळते. म्हणजे साधारणपणे रक्ताच्या नात्यांमध्ये संपत्तीचे अथवा मालमत्तेचे व्यवहार करताना भविष्यामध्ये वाद उद्भवू नयेत त्या अनुषंगाने बक्षीस पत्राची कायदेशीर प्रक्रिया केलेली असते.

मालमत्तेचे बक्षीस पत्र केल्यानंतर त्या बक्षिस पत्राचे रजिस्ट्री दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये करणे गरजेचे असते व त्या ठिकाणी ती होते. जेव्हा आई-वडील यांच्याकडून मुलांसाठी बक्षीस पत्र करून दिले जाते तेव्हा या कागदपत्रांमध्ये भविष्यात  मुलांना हस्तांतरित केली जाणारी मालमत्ता अथवा मिळकत ही आई वडिलांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये असे देखील यामध्ये नमूद केले जाते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर हे ग्राह्य धरले जात असल्यामुळे बक्षीसपत्र जेव्हा केले जाते तेव्हा चांगले वर्तणूक असलेल्या दोन साक्षीदारांच्या सह्या या बक्षीस पत्रावर घेतल्या जातात. दुय्यम निबंध कार्यालयामध्ये नोंदणी करताना बक्षीसपत्र करून देणार आहोत ज्याच्या नावे बक्षीस पत्र करायचे आहे ती व्यक्ती असे दोन्ही जण दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य असते.

 बक्षीसपत्र रद्द करता येते का?

काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये बक्षीसपत्र रद्द करता येऊ शकते. समजा एखादी घटना किंवा काही गोष्ट घडली तर बक्षीस पत्र बनवताना जर बक्षीस पत्र करून देणारा आणि आणि ज्याला बक्षीस पत्र करून दिले जात आहे म्हणजेच लाभार्थी यांनी ठरवले असेल एखादी घटना किंवा एखादी विशिष्ट गोष्ट घडली तर बक्षीस पत्र रद्द होईल आणि तसेच घटना अथवा गोष्ट जर घडली तर बक्षीस पत्र रद्द होऊ शकते. परंतु यामध्ये एखादी विशिष्ट अशी गोष्ट घडणे किंवा न घडणे यावर  डोनर अर्थात दात्याचे नियंत्रण असेल तर हे असे बक्षीस पत्र रद्द करता येत नाही.

 बक्षीस पत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का?

आपण या संबंधी महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट पाहिला तर त्याप्रमाणे बक्षीस पत्र नोंदवण्याकरिता स्टॅम्प ड्युटी भरणे गरजेचे असून कायद्याच्या अनुच्छेद 34 अन्वये जर का दात्याच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच नवरा, बायको, भाऊ किंवा बहिण यांना बक्षीस पत्राद्वारे मिळकत द्यायचे असेल तर मिळकतीच्या बाजारभावाच्या तीन टक्के मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी भरणे गरजेचे असते.

परंतु मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची असेल आणि बक्षीस पत्राच्या माध्यमातून ती मिळकत नवरा,बायको,मुलगा,मुलगी,नातू,नात, मृत पावलेल्या मुलाची पत्नी यापैकी कोणाला द्यायची असेल तर केवळ दोनशे रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. परंतु या व्यतिरिक्त इतर सर्व बक्षीस पत्रांकरिता खरेदी प्रमाणेच पूर्ण स्टॅम्प ड्युटी घेतली जाते.

ZP 2019 चे फीस परत साठी अर्ज करण्यासाठी येथे click करा

कृषी सेवक  जाहिरात 2023 येथे Download करा

कृषी सेवक  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

RBI  जाहिरात 2023 येथे Download करा

RBI ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post