LPG GAS - मोदी सरकारचा मोठा निर्णय गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

 

महागाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder Price) तब्बल 200 रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने याबाबत निर्णय घेत महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



LPG GAS - मोदी सरकारचा मोठा निर्णय गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


सध्या देशात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडूनअनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आता रक्षाबंधनच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना विशेष भेट दिली आहे. केंद्र सरकारकडून घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे देशभरातील महिला वर्ग चांगलाच खुश असणार आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1100 ते 1200 रुपये एवढा आहे. मात्र आता या किमतीमध्ये 200 रुपयांनी घट होणार आहे. ज्याचा मोठा फायदा नागरिकांना होईल.

उज्वला योजनेअंतर्गत 400 रुपयांची सूट – LPG Cylinder Price

दुसरीकडे उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरवर 400 रुपयांची सूट (LPG Cylinder Price) देण्यात आलीय. या अनुदानावर सुमारे 7,500 कोटी रुपये खर्च होणार असला तरी त्याचा भार तेल कंपन्यांना सोसावा लागणार नाही. या अनुदानाचा भार आपणच उचलणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे. तसेच देशातील महिलांना आणखी 75 लाख नवीन उज्ज्वला योजनेचे कनेक्शन देण्यात येणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. यासाठी त्यांना 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.









                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा









Post a Comment

Previous Post Next Post