राज्यात कृषी सेवक पदाच्या 952 जागेसाठी मोठी भरती होणार आहे. कृषी विभागामार्फत , विभागनिहाय जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागांमध्ये कृषी सेवक पदांची तब्बल 952 जागांसाठी पदभरती प्रक्रिया बाबत राज्य शासनाकडून विभागनिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Maharashtra agriculture department recruitment for krishi Sevak. विभागनिहाय रिक्त पदांची माहीती पुढील प्रमाणे आहे. रिक्त पद संख्या, जाहिरात,याबद्दल सविस्तरपणे माहिती आज आपण पाहणार आहोत.
विभागानिहाय रिक्त पदांची माहिती
अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
01. | नाशिक | 336 |
02. | छत्रपती संभाजीनगर | 196 |
03. | लातुर | 170 |
04. | कोल्हापुर | 250 |
एकुण पदांची संख्या | 952 |
वरील दर्शवलेल्या चार विभागातील कृषी सेवक पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उर्वरित विभागांची जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. वरील तक्त्यानुसार नाशिक विभागांमध्ये कृषी सेवक पदांची एकूण 336 जागा,छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये 196 जागा,लातूर विभागामध्ये,170 जागा तर कोल्हापूर विभागामध्ये 250 असे एकूण 952 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.
सदरील पद भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने राबविण्यात येणार असून, सदरील पदांकरिता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन/अर्ज मागविण्यात येणार आहेत.तसेच सदर पद्धत भरती प्रक्रियेचे अधिकृत जाहिरात तुम्ही खाली पाहू शकता.
अधिकृत संकेतस्थळ/वेबसाईट :- https://krishi.maharashtra.gov.in/
Post a Comment