कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत मल्टी टास्किंग आणि हवालदार पदाची 1558 जागांची मेगा भरती


  • कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) हा तृतीय श्रेणीसाठी (ग्रुप-सी)भरती आयोजित करतो.ही भरती पूर्ण भारत भर असते.
  • हा आयोग  केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती करतो.
  • कर्मचारी निवड आयोग ने मल्टी टास्किंग आणि हवालदार या 1558 रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत मल्टी टास्किंग आणि हवालदार पदाची 1558 जागांची मेगा भरती

पदांची संख्या –

  • मल्टी टास्किंग - 1198 (Non Technical Staff)
  • हवालदार- 360
  • एकूण – 1558

परीक्षा तारीख -

  1. Tier I- सप्टेंबर 2023 (Objective)
  2. Tier-II-नंतर कळविण्यात येईल (Written)

परीक्षा फीस -

  1. GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 100 /-रु.
  2. SC/ST/PWD/Exserviceman/Women – परीक्षा फीस नाही .

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर,कोल्हापूर,छ.संभाजीनगर,नांदेड,जळगाव,अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल.

वय –

  • दि.01.08.2023 रोजी रोजी 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • मल्टी टास्किंग - 18 ते 25 वर्षे ( उमेदवाराचा जन्म हा दि.02.08.1998 ते दि. 01.08.2005 च्या दरम्यानचा असावा.)
  • हवालदार - 18 ते 27 वर्षे(उमेदवाराचा जन्म हा दि. 02.08.1996 ते दि. 01.08.2005 च्या दरम्यानचा असावा.)

शैक्षणिक पात्रताफक्त 10 वी पास असणे आवश्यक.

परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा मराठी,कोंकणी(महाराष्ट साठी )हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
  • मल्टी टास्किंग या पदासाठी फक्त OBJECTIVE पद्धतीची online स्वरुपात Computer वर परीक्षा असेल.
  • हवालदार या पदासाठी फक्त OBJECTIVE पद्धतीची online स्वरुपात Computer वर परीक्षा असेल.त्यासोबत PET आणि PST ही परीक्षा असेल.

PET(Physical Efficiency Test)-

  • या Test मध्ये पुरुषांना 15 मिनिट मध्ये 1600 मी.चालावे लागते.
  • या Test मध्ये स्रीयांना 20 मिनिट मध्ये 1 कि. मी.चालावे लागते.

PST(Physical Standard Test)

  • या मध्ये वजन,उंची,छाती चे मोजमाप केले जाते.
  • पुरुषांसाठी उंची -157.5cm,छाती –न फुगवता -81 cm आणि फुगवून 5cm चा फरक असला पाहिजे.
  • स्री साठी उंची -152 cm, व वजन 48 Kg पाहिजे.

  • ही परीक्षा दोन सत्रा मध्ये असेल .
  • पहिल्या सत्रामध्ये एकूण 40 प्रश्न असतील त्यासाठी एकूण गुण 120 असतील.या सत्रासाठी 45 मिनिट चा वेळ असेल.
  • दुसऱ्या सत्रामध्ये एकूण 50 प्रश्न असतील त्यासाठी एकूण गुण 150 असतील.या सत्रासाठी 45 मिनिट चा वेळ असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.













वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा









Post a Comment

Previous Post Next Post