Talathi Exam Syllabus : महाराष्ट्र तलाठी भरती २०२4 परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम

Talathi Exam Syllabus 2024 : तलाठी भरती ची तयारी करताना विद्यार्थ्यांना सुरुवात नेमकी कोणत्या विषयापासून करावी हे माहिती नसते.त्यामुळे कमी मार्क पडतात.आपण या लेखात तलाठी भरतीची तयारी कशी करावी याची माहिती घेणार आहोत. या मध्ये मराठी, इंग्रजी व्याकरण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता तसेच जनरल नॉलेज या विषयाचा अभ्यास कसा करावा हे बघणार आहोत.

मराठी व्याकरण : (२५ प्रश्न ५० गुण)

  • मराठी विषयाचा अभ्यास करताना मराठी व्याकरण हे खूप महत्वाचे असते.
  • यासाठी मो.रा.वाळिंबे यांचे मराठी व्याकरण हे पुस्तक वापरल्यास खूप फायदा होतो.
  • तसेच बाळासाहेब शिंदे यांचे देखील मराठी व्याकरण चे पुस्तक मार्क घेण्यासाठी चांगले आहे.
  • परीक्षे मध्ये आता प्रश्न विचारण्याचा ट्रेंड बदलला असून नवीन परीक्षा पद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे.
  • तसा अभ्यास केला तर नक्कीच चांगले मार्क पडून तलाठी म्हणून निवड होऊ शकते.
  • त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करताना अडचणी येत आहे.
  • मराठी व्याकरणाचा नियमित सराव नसेल तर सोपे वाटणारे प्रश्न सुद्धा चुकून जातात.
  • समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार,
  • म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सर्व मराठी विषया संबंधित घटक आहेत.
  • त्यामध्ये सुद्धा शब्दसिद्धी हा घटक महत्वाचा आहे म्हणजे या मध्ये व्याकरणात्मक घटक येतात ते काळजी पूर्वक अभ्यासा.
  • दर्जा 12 वी चाच आहे परंतु बाकीच्या सरळ सेवे प्रमाणेच प्रश्न असतात असे समजू नये. त्यासाठी आधीच्या प्रश्न पत्रिकेचा अभ्यास करावा म्हणजे लक्षात येईल प्रश्न विचारण्याची पद्धत: कोणत्या घटकावर कश्याप्रकारे विचारतात, त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे ? हे सर्व तुमच्या लक्षात येईल .

इंग्रजी व्याकरण : (२५ प्रश्न ५० गुण)

  • या विषयाची सर्वात जास्त समस्या ही मराठी माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांना असते.
  • परंतु हा विषय चांगला समजून घेतला नाही तर मेरीट लिस्ट वर परिणाम पडतो.
  • या विषयाचा नियमित आणि चांगला सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण या विषयात मिळणे काही अवघड नसते.
  • या साठी नवनीत प्रकाशन तसेच बाळासाहेब शिंदे यांचे इंग्रजी व्याकरण चे पुस्तक वापरल्याने चांगले मार्क घेता येतील.
  • Vocabulary, similar words, opposite words, question tag, spilling mistake, Eroor,

  • Part of speech. verb and adverb, sentence tense, active voice pacive voice, one word for group, phrases. या घटकावर प्रश्न विचारतात
  • इंग्रजी व्याकरण / इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो लक्षात घ्या त्यामध्ये जास्तीत जास्त मागच्या प्रश्नांचा अभ्यास करा ( सरावा साठी ) आणि सराव पेपर सोडवायचा झाल्यास सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिका सोडवा
  • ( सरावासाठी www.mpscshort.in वर मोफत सराव प्रश्नपत्रिका आहेत त्याचा उपयोग करा ) म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते . इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण सोबत अभ्यासा म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास झाला की इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करायला घ्या म्हणजे तुमची लिंक जोडून येईल. आणि तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कशा पद्धतीचे असतात . कशा प्रकारे ते विचारतात त्याचा स्तर काय असतो कोणत्या घटकाची किती व्याप्ती आहे.कोणत्या घटकाला किती वेळ दिला पाहिजे, त्यातून नेमके किती प्रश्न येतात हे लक्षात येईल.

अंकगणित आणि बुद्धिमत्ता : (२५ प्रश्न ५० गुण)

  • मुलभूत संकल्पना यावर आधारित कमीत कमी वेळेमध्ये उत्तर देता येणारी प्रश्ने विचारली जातात.
  • मागील ग्रामसेवक,पोलीस भरती,तलाठी,लिपिक,कृषीसेवक या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बघून त्यातील प्रश्नाचा सराव करावा.
  • अंकगणित आणि बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्न वेळेत सोडविता आले तर त्याचा आपल्याल्या संपूर्ण पेपर मध्ये फायदा होतो.नाहीतर गोंधळ होतो.
  • या विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो प्राथमिक अभ्यास मजबूत असणे गरजेचे आहे. कारण
  • सरळसेवा परीक्षा आहे म्हणजे बाकीच्या परीक्षेसारखे त्या लेव्हल चे सोपे प्रश्न असतील असे गृहीत धरू नका याची पातळी पदवी आहे त्यामुळे काठिन्य पातळी ही उच्च स्तराची असते.
  • या मध्ये प्राथमिक अंकगणितावर तुमची पकड मजबूत असणे गरजेचे आहे. गणितीय 21 सूत्रे, संख्या घटक, पदावली, कंस याच्यावरती जास्त लक्ष द्या.
  • मसावी लसावी फक्त त्या घटकसाठीच नाहीत तर त्याची मदत बाकीचे प्रकरण सोडवताना होते म्हणून तेही लक्षात असू द्या. तश्याच प्रकारे शेकडेवारी हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शेकडेवारी या सोबत तुम्ही सरळव्याज, नफा तोटा, वयवारी , असे संबंधित प्रकरण हाताळू शकता हे तुमच्या लक्षात येईल.
  • चुकीचे पद ओळखा, अक्षर मालिका या संबंधित प्रश्नावर लक्ष द्या आणि पदवी स्तर आहे त्यामुळे परत सांगत आहे प्रश्न खूपच सोपे येतील बाकीच्या सरळ सेवेसारखे असे समजू नका..
  • गणिताचा अभ्यास हा सरावानेच होतो त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा कमी वेळेमध्ये जास्त गणित सोडवण्याचा प्रयत्न करा.

जनरल नॉलेज : (२५ प्रश्न ५० गुण)

  • जनरल नॉलेज या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे यामध्ये काही ठरलेलं नसतं की कोणत्या घटकावरती किती प्रश्न येणार – तरीसुद्धा चालू घडामोडी.
  • राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, इतिहास यामध्ये एक दोन एक दोन असे प्रश्न येतात तर त्यामध्ये चालू घडामोडी मध्ये जास्त अभ्यास करण्यापेक्षा थोडक्यामध्ये म्हणजे योजना हा घटक घेतला तर त्यामध्ये योजनेची सुरुवात कधी झाली त्या संबंधित घटक, वर्ष, समिति, अध्यक्ष, अश्या गोष्टी वन लाईन मध्ये अभ्यासा.
  • पुस्तक, हा घटक बघताना त्याचे लेखक कोण आहेत ? त्याच्या संबंधित पुरस्कार कोणता आहे? खेळामध्ये – संबंधित खेळाडू ? त्याचा पुरस्कार भेटलेला आहे का? त्या खेळाची सुरवात कधी झाली?
  • संशोधन- सध्या चालू घडामोडी आयोग, समिति, प्राथमिक माहीत असू द्या म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल या संबंधित शक्यतो कलम विचारण्यात येतात.
  • अर्थशास्त्रामध्ये लोकसंख्या योजना आणि बँक तीन घटक महत्त्वाचे .
  • विज्ञान या घटका मध्ये आले तर सरळ सरळ प्रश्न येतात नाहीतर लॉजिकली प्रश्न असतो .
  • इतिहास मध्ये सुद्धा प्राथमिक स्तरावरती प्रश्न विचारतात पण बाकीच्या परीक्षांपेक्षा या परीक्षेची प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे कारण यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान पदवी स्तरावर घटक आहे आणि बाकीच्या सरळसेवा परीक्षांमध्ये बारावी असतो.
  • इतिहास मध्ये कमिशनर ने केलेली काम गव्हर्नर व्हाईसरॉय या संबंधित प्रश्न विचारताना त्यांचे काम विचारतात किंवा त्यांचा कार्यकाळ किंवा एखाद्या समाजसुधारकाचे गाव त्याचे काम, लिहिलेली पुस्तक, मिळालेली पुरस्कार, स्थापन केलेल्या संस्था . कॉँग्रेस अधिवेशन , प्राचीन भारत, लोककला, संबंधित उत्सव किंवा पेहराव/ वस्त्र.असे प्रश्न विचारतात
  • सोबत भूगोलामध्ये महाराष्ट्र प्राथमिक अभ्यास नदीप्रणाली जिल्हा विशेष हे घटक महत्त्वाचे आहेत.
  • आता या सर्वांमध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारतील याची पूर्व कल्पना नसते त्यामुळे तात्याचा ठोकळा हा सरावासाठी अभ्यासणे गरजेचे राहील.





वेगवेगळ्या परीक्षा च्या माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा 





Post a Comment

Previous Post Next Post