- कृषी विषयात शिक्षण घेतलेले तरुण कृषी सेवा केंद्रांकडे एक व्यवसायाचं साधन म्हणून पाहत आहेत.
- कृषी सेवा केंद्रांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करता येते.
- पण त्यासाठी कृषी विभागाकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो.
कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवाना मिळवण्याची प्रक्रिया काय असते? आणि कृषी सेवा केंद्राचा परवाना कशामुळे रद्द होऊ शकतो? सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अर्ज कुठे करायचा-
- कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागतो.
- आपले सरकार' या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. इथं सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि मग कृषी विभाग निवडून 'कृषी परवाना सेवा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- इथं तुम्ही बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीसाठीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
- इथं कोणतीही एक गोष्ट विक्रीचा किंवा तिन्ही प्रकारचे परवाने तुम्ही मिळवू शकता.
अर्जासाठी फी किती लागते -
- कीटकनाशके विक्रीचा परवाना - 7,500 रुपये
- बियाणे विक्रीचा परवाना - 1,000 रुपये
- रासायनिक खते विक्रीचा परवाना - 450 रुपये
आवश्यक कागदपत्रे -
- ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला त्यासोबत काही कागदपत्रं जोडायची आहेत.
- जिथं दुकान टाकायचं आहे त्या जागेचा गाव नमुना-8
- ग्रामपंचायतचे ना-हरकत प्रमाणपत्र
- शॉप ॲक्ट प्रमाणपत्र
- कृषी सेवा केंद्र उभारायची जागा तुमच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र
अर्ज केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय होते -
- ऑनलाईन अर्ज सबमिट केला की तो जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्याकडे जातो.
- त्यांनी मंजुरी दिल्यानंतर कृषी उप-संचालक यांच्या टेबलावर तो अर्ज जातो. त्यांनीही मंजुरी दिली की तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जातो.
- जिल्हा कृषी अधीक्षकांच्या मंजुरीनंतर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळते.
कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द होण्याची प्रमुख दोन कारणं सांगितली जातात.ती खालील प्रमाणे आहेत.
- कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचं दर 5 वर्षांनी नूतनीतकरण करणं गरजेचं असतं. तसं न केल्यास तुमचा परवाना रद्द होऊ शकतो.
- तुम्ही तुमच्या कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीररित्या खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करत असल्याचं स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आलं आणि त्यासाठी तुम्हाला जिल्हा कृषी अधीक्षकांनी दोषी ठरवलं, तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो.!
कृषी सेवा केंद्रातून किती नफा राहतो -
- कृषी सेवा केंद्राचा विचार केल्यास, कीटकनाशक विक्रीतून 7 ते 13 %, बियाण्यांच्या विक्रीतून 10 ते 11 % आणि खतांच्या विक्रीतून 3 ते 7 % एवढा नफा कमावता येऊ शकतो.
Post a Comment