Pradhan Mantri Vishwakarma Yojna - प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कामगारांना मिळणार ५ टक्के व्याजदराने कर्ज

 


केंद्र सरकारने कारागिरांसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना लागू केली आहे. 

या योजनेद्वारे 30 लाख कारागिरांना लाभ मिळणार आहे. 

ही योजना 13 हजार कोटींची असून या योजनेमुळे देशातील कारागिराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूकही होणार आहे.

या योजनेद्वारे कारागिरांना 5 टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
Pradhan Mantri Vishwakarma Yojna  - प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कामगारांना मिळणार ५ टक्के व्याजदराने कर्ज

त्यासोबतच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून दररोज 500 रुपयांचे मानधन व प्रशिक्षणाचे प्रमाणत्र देण्यात येणार आहे.

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना ही भारत सरकारची पारंपारिक कारागीर आणि कारागीरांना कौशल्य विकास, उद्योजकता आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेली योजना आहे. 

पारंपारिक कलाकुसरीचे जतन आणि प्रोत्साहन आणि पारंपारिक कारागीर आणि कारागीरांसाठी उत्तम रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

कोणाला मिळणार लाभ : सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. याद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमागचा उद्देश देशातील कारागिरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्याच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळावी हा आहे. 

तसेच ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

अर्ज कसा करावा: 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी, गावांच्या CSC  केंद्रात नोंदणी केली जाईल आणि 3 स्तरांनंतर अंतिम निवड केली जाईल. 
  • विश्वकर्मा योजनेत राज्य सरकार मदत करतील, मात्र सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.



IDBI  जाहिरात 2023 येथे Download करा

IDBI  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

ZP 2019 चे फीस परत साठी अर्ज करण्यासाठी येथे click करा

कृषी सेवक  जाहिरात 2023 येथे Download करा

कृषी सेवक  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

RBI  जाहिरात 2023 येथे Download करा

RBI ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post