आज आपण तलाठी या पदाच्या भरती बद्दल माहिती या लेखामध्ये बघणार आहोत.
तलाठी हा महाराष्ट्र महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्दयावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. तलाठी गाव पातळीवरील नोंद वह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठ्याच्या कार्यालयाला सज्जा म्हणतात. साधारणतः 1 ते 3 गावांसाठी एक तलाठी नेमून दिला जातो. गावातील गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठ्याचा निकटचा वरिष्ठ अधिकारी असतो. मंडळ अधिकाऱ्यावर तहसीलदाराचे नियंत्रण असते.
तलाठी हा महाराष्ट्र महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्दयावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. तलाठी गाव पातळीवरील नोंद वह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठ्याच्या कार्यालयाला सज्जा म्हणतात. साधारणतः 1 ते 3 गावांसाठी एक तलाठी नेमून दिला जातो. गावातील गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठ्याचा निकटचा वरिष्ठ अधिकारी असतो. मंडळ अधिकाऱ्यावर तहसीलदाराचे नियंत्रण असते.
- तलाठी वेतन श्रेणी - S-8 : 25500-81100 + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
- तलाठी पदासाठी फॉर्म् हा ऑनलाईन पध्दतीनेच भरायचा असतो*.
- तलाठी पदासाठी परिक्षा ही ऑनलाईन स्वरुपाची असेल या अगोदर ऑफलाईन स्वरुपाची असायची
- तलाठी पदासाठी परिक्षा ही पुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी ठरलेल्या वेळेवरच असेल.या अगोदर जिल्हा निवड समिती मार्फत ही परिक्षा ज्या त्या जिल्हयात घेतली जात असे*
तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता-
- जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अर्हता प्राप्त केलेली असावी.
- संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ते प्राप्त करणे आवश्यक आहे.
- मराठी विषयाचे ज्ञान असणे आवश्यक. माध्यमिक शालान्त परीक्षेत मराठी/हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना मराठी/हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक शैक्षणीक पात्रता-
- खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे.
- खेळाडूने सदर पदासाठी सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व इतर अर्हता प्राप्त केलेली असावी.
- खेळाडूंसाठी आरक्षणाबाबत क्रीडाविषयक अर्हता अर्जासोबत क्रीडा विषयक प्रमाणपत्राची संबंधित विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण यांचेकडील पडताळणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
*माजी सैनिकांच्या अर्हतेबाबत-
पदवी परीक्षा ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एजुकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात.*तलाठी पदासाठी कमाल व किमान वयोमर्यादा खालील प्रमाणे –
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत असतो
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 18 पेक्षा कमी व 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.यामध्ये EWS चा देखील समावेश आहे.
- पदवीधारक/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी: कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील.
- खेळाडू उमेदवारांसाठी: विहित वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि, उच्चतम वयोमर्यादा 43 इतकी राहील.
- अपंग उमेदवारांसाठी: उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्ष इतकी राहील. तथापि अपंग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान अपंगत्वाचे प्रमाण 38 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी: सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी: माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील. तसेच, अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45वर्षापर्यंत राहील.
- स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी : सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील.
- अनाथ : कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील
(तथापि महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव 2023/प्र.क्र./14/कार्या12दि.3मार्च 2023 अन्वये दि31डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.)
*परीक्षेचे स्वरूप-
- तलाठी भरती परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी(Optional) एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशा प्रकारे तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची असते. यामध्ये मराठी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), सामान्य ज्ञान विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) व गणित व बुद्धिमत्ता विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) विचारले जातात.
- या परीक्षेसाठी एकूण दोन तासांचा वेळ असतो.
*तलाठी पदासाठी अभ्यासक्रम –
1) मराठी -
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम व सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. इत्यादी2) इंग्रजी -
Vocabulary, Synonyms and Antonyms, Proverbs, Tense and kinds of Tense, Question tag, Use proper form of verbs, Spot the error, Verbal, Phrases comprehension, Passage, Spellings, Sentence, Structure, One word Substitutions.etc3) अंकगणित व बुद्धिमत्ता -
(a) अंकगणित -
अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ काम वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिमाणे, घड्याळ इत्यादी(b) बुद्धिमत्ता -
अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक अक्षर आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती. इत्यादी4) सामान्य ज्ञान
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, इत्यादी5) चालू घडामोडी – सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन इत्यादी
वेगवेगळ्या परीक्षा च्या माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment